मंत्रालयातील उपसचिवाला बच्चू कडूंची मारहाण, कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन

March 29, 2016 5:26 PM0 commentsViews:

BACHHU MARHAN
मुंबई – 29 मार्च : आपल्या अनोख्या आंदोलनामुळे सतत चर्चेत राहणारे अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मारहाण केल्याचा आरोप करीत मंगळवारी दुपारी मंत्रालयातील कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन केले. मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागात उपसचिव म्हणून कार्यरत असलेल्या गावित यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.

मारहाणीनंतर गावित यांचा रक्तदाब वाढल्यामुळे त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आंदोलनावेळी मंत्रालयातील तळमजल्यावर सर्व कर्मचारी एकत्र आले होते. यावेळी बच्चू कडू यांच्या या कृतीचा या प्रकरणाचा निषेध म्हणून मंत्रालयातील कर्मचार्‍यांनी एल्गार पुकारला असून मंत्रालयात काम बंद आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. बच्चू कडू यांच्यावर अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मंत्रालय कर्मचार्‍यांनी केली आहे.

दरम्यान, ही घटना गंभीर आहे, अधिकार्‍यांना मारहाण होत असेल तर कारवाई केली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. मुख्य सचिवांनी चौकशी करून माहिती द्यावी, अशी सूचना दिली आहे. वस्तुस्थिती कळल्यावर नियमानुसार कारवाई करू, असं खडसे म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close