कन्हैय्या कुमार 14 एप्रिलला पुण्यात येण्याची शक्यता, राष्ट्रवादी देणार संरक्षण

March 30, 2016 8:53 AM0 commentsViews:

KANHAIYA-KUMAR-facebookपुणे – 30 मार्च : जेएनयू छात्र संघाचा अध्यक्ष आणि देशद्रोहाचा आरोप असलेला कन्हैय्या कुमार 14 एप्रिलला पुण्यात येण्याची शक्यता आहे. पुण्यातील विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी कन्हैय्याला भेटले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला तो पुण्यात यायला तयार असल्याचं समजतंय.

फर्ग्युसन कॉलेज आणि रानडे इन्सिटट्यूटच्या विद्यार्थ्यांनी कन्हैया कुमाराला पुण्यात बोलवण्याचा निर्णय घेतलाय. त्यांच्या निर्णयामुळे भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी कन्हैयाकुमारला बोलावलं तर ठोकून काढू असा इशाराच दिलाय. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या आवारात कन्हैया कुमारच्या कार्यक्रमाला कुलगुरूंनी मनाई घातली आहे. पण, कन्हैयाला पुण्यात बोलवण्यावर विद्यार्थी ठाम आहे. राष्ट्रवादीनेही या प्रकरणात उडी घेतलीये. राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेनं कन्हैय्याला संरक्षण द्यायची भूमिका जाहीर केलीये. तर भाजयुमोनं कन्हैय्याला परवानगी नको असं पत्र पोलिसांना दिलंय. दुसरीकडे, संभाजी ब्रिगेडने फर्ग्युसनच्या प्राचार्यांच्या हकालपट्टीची तर आरपीआय गटाच्या सचिन खरात याने ऍट्रॉसिटी कारवाईची मागणी केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close