बारबालांच्या शोषण केल्यास10 लाखांचा दंड, डान्सबारमध्ये प्रवेशासाठी अोळखपत्रही सक्तीचं !

March 30, 2016 9:09 AM0 commentsViews:

dance-bar-bar-girls_bdbdbae0-e058-11e5-9948-13623a58218cमुंबई – 30 मार्च : मुंबईत झमझम सुरू होण्याचा मार्ग सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मोकळा झालाय. पण, आता डान्सबारबाबत राज्य सरकारने कायदा आणखी कडक करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार ग्राहकांना बारबालांवर दौलतजादा करण्यास मनाई घालण्यात येणार आहे. तसंच बारबालांच्या शोषणास जबाबदार असणाऱ्यांना सहा महिन्यांची शिक्षा आणि 10 लाखांचा दंड ठोठवण्याची तरतूद विधेयकात करण्यात आलीये.

डान्स बारबाबतचा नवा कायदा जास्त कडक करण्याची राज्य सरकारची भूमिका आहे. सध्या सुरू असलेल्या बजेट अधिवेशनात या विधेयकाचा मसुदा विधिमंडळाच्या संयुक्त संसदीय समितीला सादर करण्यात आला. त्यावर समितीचा अभिप्राय मागवण्यात आलाय. यामध्ये नव्या कायद्यात शाळा आणि धार्मिक स्थळापासून एक किलो मीटरच्या परिसरात डान्सबारना परवानगी मिळणार नाही. बारच्या आत आणि बाहेरही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची तरतूद करण्यात येणार आहे. बारबालांना स्पर्श करणार्‍यांना सहा महिने तर बारबालांच्या शोषणाला जबाबदार असणार्‍यांना तीन वर्षे शिक्षा आणि 10 लाखांचा दंड अशी तरतूद करण्यात आली आहे. तसंच डान्सबारमध्ये प्रवेशासाठी ग्राहकांना ओळखपत्र सक्तीचे करण्याची तरतूद करण्यात आलीये.

नव्या डान्सबार कायद्यातल्या तरतुदी

 डान्सबारमध्ये प्रवेशासाठी ग्राहकांना ओळखपत्र सक्तीचे
 डान्सबारमध्ये तसेच बाहेरही सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक
 निवासी क्षेत्रात डान्सबारला परवानगी नाही
 डान्सबार सायंकाळी सहा ते रात्री साडेअकरा वाजेपर्यंतच सुरू ठेवावेत
 प्रत्येक बारमध्ये तीन महिला सुरक्षा रक्षक नेमण्याची सक्ती
 बारच्या ठिकाणी पाळणाघराची सुविधा द्यावी लागणार
 10 बाय 12 फूट आकाराचा रंगमंच बांधून त्यावर सर्व बाजूंनी तीन फूट उंचीचा कठडा बांधावा लागेल
 स्टेज आणि ग्राहकांमध्ये पाच फुटांचे अंतर असेल
 ग्राहकांना बारबालांवर दौलतजादा करण्यास मनाई
 बारबालांना स्पर्श केल्यास सहा महिन्यांची शिक्षा
बारबालांसाठी निवृत्ती वेतन, भविष्य निर्वाह निधी, वेतन आणि इतर भत्ते यांचा समावेश असलेल्या पगारपत्रकाचे करार करावे लागणार


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close