अबब..,तब्बल 40 लाख डाॅलरचे बूट

March 30, 2016 12:56 PM0 commentsViews:

shoes_4million30 मार्च : तुम्ही तुमच्या शूजसाठी किती रुपये मोजाल ? 100, 500 किंवा अगदी डिझायनर असतील तर जास्तीत जास्त एक हजार ते तीन हजार रुपये…पण अमेरिकेतल्या शूजची किंमत ऐकून तुमचे डोळे नक्कीच पांढरे होतील…या शूजची किंमत आहे…तब्बल 40 लाख डॉलर्स…कारण हे शूज हिरेजडीत आहेत.

एका लक्झरी ज्वेलरनं शूज डिझाईन करणार्‍या डिझायनरसोबत हे शूज तयार केलेत. न्यूयॉर्कमध्ये या शूजचं अनावरण करण्यात आलं.न्यूयॉर्क मधला लक्झरी ब्रांड बिकिऑन आणि डिझायनर डॅन गामाचे यांनी मिळून हे शूज तयार केले आहे. सोल्स फॉर साऊल्ससाठी या शूजचा लिलाव होणार आहे. 2006 पासून आतापर्यंत या कंपनीनं शंभराहून अधिक देशांत दोन कोटी 60 लाखांपेक्षा जास्त शूज दान केले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा