आमदार बच्चू कडू यांना आज अटक होण्याची शक्यता

March 30, 2016 1:46 PM0 commentsViews:

bacchu_kadu330 मार्च : मंत्रालयामध्ये सहसचिवांना मारहाण प्रकरणी आमदार बच्चू कडू यांना आज (बुधवारी) अटक होण्याची शक्यता आहे. मंत्रालयात सहसचिवांना काल मंगळवारी बच्चू कडू यांनी मारहाण केली होती.

बुधवारी आमदार कडू यांनी आपल्याला मारहाण केली असा आरोप सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव बी.आर.गावित यांनी केलाय.
बच्चू कडूंच्या मारहाणीच्या निषेधार्थ मंत्रालयातील कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन सुरू आहे. बच्चू कडू यांना अटक होईपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवलं जाणार आहे. बच्चू कडूंवर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी कर्मचार्‍यांनी केली आहे.

बच्चू कडूंचा खुलासा

अशोक चव्हाण नावाचा एक सर्वसाधारण कर्मचारी आहे. त्यांच्या पत्नीला ह्रदयविकाराचा आजार जडलाय. शासकीय निवासस्थानात राहण्यासाठी मुदतवाढ मिळावी या मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून अशोक चव्हाण हे मंत्रालयात पायपीट करत आहे. त्यानंतर अशोक चव्हाण हे माझ्याकडे आले. त्यांच्या मुदतवाढ मागणीबद्दल मी बी.आर.गावित यांच्याकडे विचारणा केली असता आधी उडावीउडवीची उत्तर देण्यात आली. नंतर असं लक्ष्यात आलं की, गावित यांनी अशोक जाधव यांचं नाव मुदतवाढच्या फाईलमध्ये न टाकता त्यांचं नाव नवीन निवास्थान मागणीच्या फाईलमध्ये टाकलं. आणि ही फाईल पुढे पाठवली. नवीन निवास्थानच्या शेर्‍यामुळे त्यांचं काम अजून लांबणीवर पडलं. मी फक्त त्यांना याबद्दलचा जाब विचारला होता. त्यांना मारहाण केलीच नाही. गावित यांनी याच भांडवलं केलं आणि मारहाण केल्याचा आरोप केलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close