… नाहीतर देवनारचा प्रश्न आमच्या पद्धतीने सोडवू – उद्धव ठाकरे

March 30, 2016 4:39 PM0 commentsViews:

uddhav on MeatBan
मुंबई – 30 मार्च :  देवनार डंपिंग ग्राउंडचा प्रश्न केंद्र सरकार, राज्य सरकार आणि बीएमसीनं एकत्रितपणे तीन महिन्यांत सोडवला नाही तर शिवसेनेला आपला मार्ग मोकळा आहे असा सूचक इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. सराफा व्यापारी, पठाणकोट, उत्तराखंड, देवनार, राज्य विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या मुद्यांवर उद्धव ठाकरे यांनी आज (बुधवारी) भाजपवर सडकून टीका केली आहे. डंपिंग ग्राउंडच्या प्रकरणात राजकारण घाणेरडं होत असल्याची टीकाही उद्धव यांनी भाजपचं नाव न घेता केली.

केंद्र सरकार ज्यांनी पठाणकोटमध्ये हल्ला केला त्यांचं स्वागत करतंय पण सराफा व्यापारींशी चर्चा करायला तयार नाहीये अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली. तसंच, केंद्राने सराफा व्यावसायिकांचा प्रश्न सोडवला नाही तर शिवसेनाही आंदोलनाला पाठिंबा देणार असं आश्वासनही उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.

उत्तराखंडमधील राजकीय परिस्थिती बद्दल बोलताना त्यांनी भाजपवर टीका केली. लोकशाही पद्धतीने लोकशाहीचे प्रश्न सोडवायला हवेत. सरकार अल्पमतात असतं तर स्वताहून पडलं असतं. सत्ता स्थापनेसाठी घिसाडघाई कशाला? ही लाजिरवाणी गोष्ट आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हिंदूंची मतविभागणी होऊ नये यासाठी शिवसेनेने राज्याबाहेर निवडणूक लढवली नव्हती. पण ज्या पद्धतीने महाराष्ट्र आणि इतर ठिकाणी घटना घडल्या आहेत त्यामुळे इतर राज्यातही आम्ही निवडणुका लढवणार असही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close