छत्तीसगडमध्ये माओवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे 7 जवान शहीद

March 30, 2016 7:18 PM0 commentsViews:

chatttisgadd

छत्तीसगड – 30 मार्च :  छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफच्या गाडीवर केलेल्या हल्ल्यात 7 जवान शहीद झाले आहेत.

जवानांची गाडी मैलावडा या भागातून जात असताना, माओवाद्यांनी रस्त्यात पेरलेल्या भूसुरुंगांचा स्फोट झाला. स्फोट एवढा शक्तिशाली होता की, स्फोटानंतर 7 जवान जागीच शहीद झाले.

शहीद झालेले सर्व जवान 230 बटालियनचे असल्याचे सांगण्यात येत आहे. दंतेवाड्याच्या पोलीस अधिक्षकांनी याबाबतची माहिती दिली आहे. या हल्ल्यात अनेक जवान जखमी झाल्याची माहितीही मिळत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close