अधिकारी मारहाण प्रकरणी आमदार बच्चू कडू पोलिसांना शरण

March 30, 2016 10:01 PM0 commentsViews:

sdsadasy

मुंबई – 30 मार्च :  अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं आहे. माझ्यावर खोटे आरोप करुन गुन्हे दाखल केले, असा आरोप आमदार बच्चू कडू यांनी यावेळी केला आहे.

आमदार बच्चू कडू यांनी मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव भारत गावित यांना मारहाण केली. या मारहाणीनंतर मंत्रालयातील कर्मचार्‍यांनी एल्गार पुकारला असून कामबंद आंदोलनही सुरु केलं होतं. तसंच बच्चू कडू यांच्यावर अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मंत्रालय कर्मचार्‍यांनी केली.

दरम्यान, मुख्य सचिवांच्या आश्वासनानंतर मंत्रालयातील कर्मचार्‍यांनी सोमवारपर्यंत आंदोलन स्थगित केलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close