ट्रक बनले मॉडर्न

March 19, 2010 11:40 AM0 commentsViews: 5

19 मार्चरस्ता अडवून धरणारे अवाढव्य, जुनाट ट्रक आता इतिहासजमा होणार आहेत. त्यांच्या जागी नवे वेगवान आणि आरामदायी ट्रक आता रस्त्यावर येणार आहेत.चित्रविचित्र रंगकाम…भडक रंग दिलेल्या लाकडी केबिन…ही ओळख असणारे जुने अवाढव्य ट्रक आता रस्त्यावरून गायब होणार आहेत. आणि नवे वेगवान ट्रक रस्त्यावर येणार आहेत..हे ट्रक दिसायला आकर्षक आणि चालवायलाही कम्फर्टेबल असतील.4 प्रकारचे सीट ऍरेंजमेंट, 3 प्रकारचे स्टिअरिंग सेटींग, अत्याधुनिक उपकरणे आणि आरामदायक कुशन्स ही या नव्या ट्रकची खासियत आहे.ज्यांना कित्येक किलोमीटर प्रवास करावा लागतो ते ट्रक ड्रायव्हर आता या नव्या ट्रकवर नक्कीच खूष होतील.

close