‘भाजयुमो’ माजी अध्यक्ष गणेश पांडेच्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

March 30, 2016 10:59 PM0 commentsViews:

ganesh pande

मुंबई – 30 मार्च :  भारतीय जनता युवा मोर्चाचा माजी अध्यक्ष गणेश पांडे याच्याविरुद्ध अखेर आज वर्सोवा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. गणेश पांडेवर कलम 354A, 509 आणि 34नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

भाजयुमोच्या एका महिला कार्यकर्तीने गेल्या आठवड्यात आशिष शेलार यांच्याकडे तक्रार केली होती की गणेशने मथुरामध्ये तिचा विनयभंग केला. त्यानंतर गणेश पांडेची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. तसंच मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण महिला आयोगाकडे सुपूर्द केलं होतं. पण या प्रकरणी फौजदारी कारवाई व्हावी, अशी मागणी महिला आमदारांनी लावून धरली होती. अखेरीस आज पीडित महिलेने स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली.

दरम्यान, गणेश पांडेकडे पैसा आणि पॉवर आहे, त्याच्यावर राजकीय वरदहस्त आहेच पण सोबतच त्याचे अंडरवल्डशी संबंध आहेत असा आरोप या पिडीत महिलेनं केला आहे. 4 मार्चला मथुरेत विनयभंग झाला. मी सुरुवातीला घाबरले होते, एकमेव असलेली प्रत्यक्षदर्शी मला साथ देणार नाही हे मला घटना घडली त्याच्या दुसर्‍याच दिवशी कळुन चुकलं होतं. त्यामुळे मी शांत राहीले, थोडी घाबरलेही होते. त्यामुळे तक्रार करायला वेळ गेला असं तिने सांगितलं.

तसंच मी खरं बोलतेय का खोटं याची शहानिशा करण्यासाठी नार्को टेस्ट करायला मी तयार आहे, तसंच त्याचाही नार्को टेस्ट करावी असंही पिडीत महिलेचं म्हणणं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close