किसान सभेचा महामुक्काम सत्याग्रह मागे

March 31, 2016 9:04 AM0 commentsViews:

nsk3नाशिक -31 मार्च : शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी नाशिकमध्ये करण्यात आलेला किसान सभेचा महामुक्काम सत्याग्रह स्थगित करण्यात आलाय. मंगळवारी नाशिकमध्ये हा सत्याग्रह सुरू करण्यात आला होता. त्यानंतर बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना चर्चेसाठी आमंत्रण दिलं. ही चर्चा यशस्वी झाल्याचं सांगण्यात आलं.

मुख्यमंत्र्यांनी अंशतः मागण्या मान्य केल्यानंतर सत्याग्रह आंदोलन मागे घेण्यात आलं. अधिवेशनानंतर सर्व मागण्यांचा फेर आढावा घेण्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती सीपीएमचे आमदार जे पी गावित यांनी दिली. मात्र, सरकारनं दिलेलं आश्वासन पाळलं नाही तर मुंबईला पुन्हा आंदोलन करण्यात येईल असा इशारा किसान सभेनं दिलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close