माझ्याविरोधात खोटे गुन्हे दाखल – बच्चू कडू

March 31, 2016 9:11 AM0 commentsViews:

bacchu_kadu3मुंबई – 31 मार्च : मंत्रालयातल्या अधिकार्‍याला मारहाण प्रकरणात आमदार बच्चू कडू स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाले. मरीन लाईन्स पोलीस स्टेशनला ते हजर झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. माझ्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, असा आरोपही बच्चू कडू यांनी केला आहे.

अधिवेशन चालू असताना अटक होऊ नये असं मला वाटत होतं. मी काही मोठा गुन्हा केला नाही. मला जनतेचे प्रश्न मांडायचे होते. बच्चू कडू स्वतःच्या कामासाठी गेला असता तर मान्य होतं, पण मी सामान्य माणसांसाठी गेलो होतो. माझ्या अधिकारावर गदा आणण्याचा हा प्रकार आहे असं बच्चू कडू यांनी म्हटलंय. मिळालेल्या माहितीनुसार, बच्चू कडूंना रात्रभर मरिन ड्राईव्हच्या पोलीस ठाण्यातच ठेवण्यात आल्याचं कळतंय. आज त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यावेळीही त्यांच्या समर्थकांकडून आंदोलन केलं जाण्याची शक्यता आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close