भारताचं वर्ल्ड कपचं स्वप्न भंगलं, वेस्ट इंडीजचा विजय

March 31, 2016 10:45 PM0 commentsViews:

Ce5Kl27XEAABshM

31 मार्च : टी-20 वर्ल्ड कपच्या दुसर्‍या सेमिफायनलमध्ये वेस्ट इंडिजने भारतावर शानदार विजय मिळवत फायनल मध्ये धडक घेतली. भारताने दिलेल्या 193 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजने लेंडल सिमन्सच्या 82 आणि चार्लसच्या 52 धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर 3 विकेट गमावत 19.4 ओव्हरमध्येच हे लक्ष्य पार केलं.

  भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना, भारतासाठी सर्वात मोठा धोका असलेला ख्रिस गेल दुसर्‍या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला आहे. बुमराहने त्याला क्लीन बोल्ड केले. गेल नंतर वेस्टइंडिजला दुसरा हादरा बसला तो सॅम्युअल्सच्या रुपात त्याला नेहराने राहणेच्या हाती झेल बाद केले. त्याने 8 धावा केल्या. भारताला विकेटची अत्यंत आवश्यकता असाताना विराटने एन भरात असलेल्या चार्लसला शर्माच्या हाते झेलबाद केले. चार्लसने 36 चेंडूत 52 धावांची खेळी केली.

तत्पूर्वी विराट कोहलीच्या फटकेबाजीने वानखेडेवर जणू धावांचे वादळ मुंबईकरांनी अनुभवले. कोहलीच्या 89 धावांच्या जोरावर भारताने विंडिजसमोर तगडे आव्हान उभे केले. टीम इंडियाच्या सलामीवीर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेने दमदार सुरवात केली. भारताने 12 ओव्हर्समध्ये 1 गडी गमवत 98 रन्स केले होते. तर रोहित शर्मा 43 रन्स करून बाद झाला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close