भुजबळांना जामीन नाहीच, 13 एप्रिलपर्यंत कोठडीत वाढ

March 31, 2016 1:55 PM0 commentsViews:

sameer_And_chagan_bhujbalमुंबई – 31 मार्च : मनी लाँड्रिंग आणि महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांना दिलासा मिळालाच नाही. छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या न्यायलयीन कोठडीत 13 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आलीये.त्यामुळे भुजबळांचा मुक्काम आर्थर रोड कारागृहामध्येच असणार आहे.

छगन भुजबळ यांची ईडी कोठडीची मुदत आज संपली. त्यांना सकाळी मोक्का कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी समीर भुजबळ यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी करण्यात आलीये. छगन भुजबळ यांच्या वकिलांनी जामिनीसाठी जोरदार युक्तीवाद केला. पण, ईडीच्या वकिलांनी अधिक चौकशीची मागणी लावून धरली. कोर्टाने ईडीची बाजू घेत छगन भुजबळांच्या कोठडीत 13 एप्रिलपर्यंत वाढ केलीये.

याआधी समीर भुजबळ यांच्या अटकेनंतर ईडीने 14 मार्च रोजी छगन भुजबळ यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. चौकशीनंतर भुजबळ यांना अटक करण्यात आली. त्यानंतर दोन दिवसांची कोठडी देण्यात आली होती. दोन दिवसांच्या कोठडीनंतर कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 31 मार्चपर्यंत कोठडी सुनावली होती. या चौकशी दरम्यान, छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली. आता कोर्टाने भुजबळांच्या कोठडीत वाढ केलीये. दरम्यान, छगन भुजबळ यांच्यासह 52 जणांवर मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने काल आरोपपत्र दाखल केलं. सेशन कोर्टात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं. या आरोपपत्रामध्ये 30 साक्षीदारांच्या साक्षी आहेत. एकूण 11 हजार 428 पानांचं आरोपपत्र आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close