आमदार बच्चू कडू यांना जामीन मंजूर

March 31, 2016 9:34 PM0 commentsViews:

bachu kadui

मुंबई – 31 मार्च :  मंत्रालयातल्या अधिकार्‍याला मारहाण केल्याप्रकरणी आमदार बच्चू कडू यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, बच्चू कडू यांना तक्रारदारावर दबाव आणला जाऊ नये या अटींवर सोडण्यात आलं आहे.

बच्चू कडू यांच्या अटकेचे आदेश निघाल्यानंतर ते स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाले होते. त्यांना कालची अख्खी रात्र मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातच घालवावी लागली. माझी बाजू कुणीच ऐकून घेतली नाही, माझ्यावर अन्याय झाला आहे, असं बच्चू कडू म्हणाले. लवकरच मंत्रालयातल्या कामचुकार आणि भ्रष्ट अधिकार्‍याविरोधात लढा उभारणार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आमदार बच्चू कडूंच्या अटकेचे पडसाद आज विधानसभेसह अमरावती जिल्ह्यातही पहायला मिळले. बच्चू कडू यांच्या समर्थनात प्रहार संघटनेनं रस्त्यावर उतरत रास्तारोको आंदोलनाला सुरुवात केली. जिल्ह्यातील चांदूर बाजार-परतवाडा आणि परतवाडा-अमरावती या रस्त्यांवर आंदोलन सुरु असून दोन्ही मार्गांवर चक्काजाम करण्यात आला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close