आझमींची चौकशी होणार

March 19, 2010 1:46 PM0 commentsViews:

19 मार्चमुंबईत गेल्या आठवड्यात एटीएसने अटक केलेल्या दोन संशयीत अतिरेक्यांच्या घरी अबू आझमींनी काल भेट दिली. ही बाब गंभीर असून याप्रकरणाची योग्य चौकशी करण्याचे आश्वासन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिले आहे.दरम्यान अबू आझमी यांचा अतिरेक्यांशी संबंध असल्याचा आरोप होत असल्याने त्यांनी सभागृहात स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी आमदार गिरीष बापट यांनी केली.तर अबू आझमी हे सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलण्याऐवजी दुसर्‍याच मुद्यांवर बोलत आहेत. त्यामुळे सभागृहाचा वेळ आणि वातारवण खराब होत असल्याची तक्रार महसूलमंत्री नारायण राणे यांनी अध्यक्षांकडे केली. त्यामुळे अध्यक्षांनी अबू आझमींना भाषण आटोपते घ्यायला सांगितले.

close