यंदा मान्सून सरा’सरी’ !

April 1, 2016 11:24 AM0 commentsViews:

monsoon_rainपुणे – 01 एप्रिल : दुष्काळाने होरपळणार्‍या महाराष्ट्रातील जनतेला आता गारेगार दिलासा मिळणार आहे. यंदा मान्सून सरासरी गाठणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं व्यक्त केलाय.

यावर्षी `एल नीनो`ची तीव्रता कमी झाल्यानं त्याचा नैऋत्य मोसमी वार्‍यावर फारसा परिणाम होणार नाही. पावसाचा अंदाज वर्तवण्यासाठी समुद्राच्या पाण्याचे तापमान हा सर्वाधिक महत्वाचा घटक आहे. समुद्राच्या खोल भागात उष्णपाण्याचे जे प्रवाह असतात त्यावरून पावसाचा अंदाज बांधण्यास मदत होते. गेल्या वर्षी अल निनोचा प्रवाह सक्रिय असल्यानं देशात पाऊस समाधानकारक झाला नव्हता. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये दुष्काळी स्थिती होती. एल नीनोचा प्रभाव आणखी कमी होण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या शेवटी आणि मे महिन्यात हवामान खात्यातर्फे आणखी अंदाज व्यक्त करण्यात येणार आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close