घरांचे स्वप्न महागणार, रेडीरेकनरच्या दरात 7 टक्क्यांने वाढ

April 1, 2016 11:34 AM0 commentsViews:

home_readyreckonerमुंबई – 01 एप्रिल : सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न आता अधिक महाग होणार आहे. रेडीरेकनरच्या दरात सरासरी सात टक्के वाढ करण्यात येत असल्याची घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत केली.

रेडीरेकनरच्या दरात वाढ झाल्याने जमिनीच्या आणि घरांच्या किमतीत वाढ होणार आहे. आजपासून ही दरवाढ लागू होणार आहे. दुष्काळामुळे राज्याच्या तिजोरीला मोठा फटका बसला आहे. राज्यावरील कर्जाच्या बोज्यातही वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेडीरेकनरच्या दरात सरासरी 7 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांतील ही सर्वात कमी दरवाढ आहे. यापूर्वी 2010 मध्ये 14 टक्के, 2011 मध्ये 18 टक्के दरवाढ करण्यात आली होती.

रेडी रेकनर दरात वाढ
पुणे- 15 टक्के
 मुंबई- 7 टक्के
 कोकण- 5 टक्के
नाशिक – 7 टक्के
औरंगाबाद- 6 टक्के
अमरावती- 8 टक्के
नागपूर- 6 टक्के

काय आहे रेडीरेकनर ?
– नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातर्फे हा दर आकरला जातो, त्या भागातला जमिनीचा दर, त्याची मागणी आणि इमारतींची स्वरूप याचा विचार करून दर आकरणी केली जाते, यालाच रेडीरेकनर असं म्हणतात.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close