जळगावात पारा 43 अंशांवर

March 19, 2010 1:57 PM0 commentsViews: 2

19 मार्चमार्च महिन्याच्या सुरुवातीलाच जळगाव शहराला कडक उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. जळगावचे आजचे तापमान 43 अंश सेल्सीअसच्या वर गेले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. उष्माघाताचा फटका बसू नये म्हणून नागरिक रुमाल, स्कार्फचा उपयोग करत आहेत. तर रसवंती गृहे आणि शीतपेयांच्या दुकानांमध्ये गर्दी दिसू लागली आहे.दुसरीकडे नागपुरातही पारा 39 अंशांवर पोहचला आहे. संपूर्ण विदर्भात जवळपास हीच स्थिती आहे.

close