सुमन काळे मृत्यू प्रकरणी उपोषणाचा इशारा

March 19, 2010 2:05 PM0 commentsViews: 1

19 मार्चपोलिस कोठडीत झालेल्या मारहाणीत काही दिवसांपूर्वी नगर जिल्ह्यातील पारधी समाजातील सुमन काळे ही मृत्यूमुखी पडली होती. या प्रकरणातील आरोपींना जामीन नाकारल्यानंतरही अटक होत नाही. हे प्रकरण सध्या सीआयडीकडे आहे. पण सीआयडी मुद्दाम याचा तपास संथ गतीने करत आहे, असा आरोप सीआयडीचे माजी लॉ ऑफिसर ऍड. शिवाजी काळे यांनी केला आहे. या आरोपींना तात्काळ अटक व्हावी यासाठी त्यांनी 2 एप्रिल पासून सीआयडीच्या मुख्यालयासमोर बेमुदत उपोषणाचाही इशारा दिला आहे. औरंगाबाद खंडपीठाने जामीन नाकारल्यानंतर यातील आरोपींनी सुप्रीम कोर्टात अपील केले होते. पण जामीन फेटाळण्याची शक्यता निर्माण झाल्यावर हे अपील मागे घेण्यात आले. त्यामुळे आरोपींना जामीनाचे कोणतेही संरक्षण उरलेले नाही. पण सीआयडीचे प्रमुख याबाबत कोणतीही कारवाई करीत नसल्याचा आरोप ऍड. काळे यांनी केला आहे. काळे यांच्या उपोषणास पारधी संघटनांनीही पाठींबा दिला आहे.

close