पाणी चोरांविरोधात मनसेची कारवाई

March 19, 2010 2:12 PM0 commentsViews: 2

19 मार्चमाटुंग्याच्या तुलसी पाईप रोडवर पाणी चोरून विकणार्‍या आणि ते विकत घेणार्‍या 25 जणांना आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. माटुंगा रोड स्टेशनच्या बाहेरून जाणार्‍या ड्रेनेज लाईनमध्ये जवळपास 6 ते 7 इंची पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आहे. ही पाईपलाईन फोडून तिच्यातील पाणी चोरुन ते येथील टॅक्सीवाल्यांना टॅक्सी धुण्यासाठी विकण्यात येते. पाण्याची एक बादली 5 रुपयांना विकण्यात येते. रोज जवळपास 100 शंभर ते 150 टॅक्सी या ठिकाणी अशा प्रकारे पाणी विकत घेऊन धुतल्या जातात.

close