मुंबईत आईने पोटच्या 3 मुलांना ऊसाच्या रसातून पाजलं विष

April 1, 2016 6:23 PM0 commentsViews:

sadsadsadsad1 copy

मुंबई – 01 एप्रिल : मुंबईतील उच्चभ्रू समजल्या जाणार्‍या जुहू भागात एका महिलेने प्रियकराच्या सोबतीने पोटच्या तीन मुलांना ऊसाच्या रसातून विष पाजून मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे जुहू भागात एकच खळबळ उडाली आहे.

आरोपी महिलेचे परपुरूषाशी प्रेमसंबंध होते. 7 महिन्यांपूर्वी आरोपी महिलेचा तिच्या नौर्‍यासोबत घटस्फोट झाला होता. त्यानंतर ती त्याच्यासोबत प्रियकरासोबत राहत होती, तर तिची 3 मुलं तिच्या पतीसोबत राहतात. काल रात्री ही महिला मुलांना भेटायला आणि त्यांना ऊसाचा रस पाजला. त्यानंतर मुलांना त्रास होऊ लागल्यानं त्यांना लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. असून त्यातील एका मुलाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.

पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून मुलांना जीवे मारण्याचा प्रयत्न कशासाठी केला, याचा तपास पोलीस करत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close