देवनारची आग का विझत नाही?, कर्मचार्‍यानेच उघड केलं आगीमागचं सत्य

April 1, 2016 6:40 PM0 commentsViews:

मुंबई – 01 एप्रिल :  देवनारमध्ये याआधीही अनेकदा आग लागत होती, मग आताच असं काय झालं की ही आग काही केल्या विझत नाहीये?

गेले अनेक दिवस देवनारच्या डंपिंग ग्राऊंडमध्ये वारंवार आग लागतीये. एवढंच नाही, तर एकाच वेळी अनेक ठिकाणी आग लागतेय. इथले रहिवासी तर हवालदिल झाले आहेत. आगीमुळे परिसरात धुराचं साम्राज्य पसरलंय. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होणं, सतत खोकला असणं, दम्याचे रुग्ण आणि लहान मुलांना त्रास होणं, अशा अनेक समस्यांना ते सामोरे जातायेत.

Deonar
यासंदर्भात आम्ही थेट देवनार डंपिंग ग्राउंडवर काम करणार्‍या एका कर्मचार्‍याला गाठलं आणि यामागचं नेमकं गौडबंगाल काय आहे ते जाणून घेतलं आम्ही प्रयत्म केला.

डम्पिंग ग्राऊंडवर गुंडांचं वर्चस्व आहे. अनेकदा इथल्या गुंडांकडूनच आग लावली जाते. या गुंडांना पालिकेचे कर्मचारीही मदत करतात. एवढचं नाही तर, कचरागाडीचे चालकही या गुंडांना सामील आहे. त्यामुळे गुंड, कर्मचारी आणि मनपा अधिकार्‍यांचे लागेबांधे असल्याची धक्कादायक माहिती यावेळी समोर आली.

देवनारची आग का विझत नाही?

फाईव्हस्टार हॉटेलमधून आणलेला कचरा रस्त्यावरच टाकतात
रस्त्यावरच ढीग साचल्यानं आगीपर्यंत पोहोचता येत नाही
आग विझवताना कचर्‍याचे ढीगच ठरतायत अडथळे
कचरा सपाट करणार्‍या मशीन्स कामच करत नाहीत
आगीकडे पालिका कर्मचारी गांभीर्याने पाहत नाहीत
अनेकदा गुंडांकडूनच आग लावली जाते
पालिकेचे कर्मचारीही गुंडांना मदत करतात
कचरागाडीचे चालकही गुंडांना सामील
कचरा साफ न करताच परस्पर बिलं उचलली जातात
पोकलेन्सचे तासही वाढवून दाखवले जातात
गुंड, कर्मचारी आणि मनपा अधिकार्‍यांचे लागेबांधे
डम्पिंग ग्राऊंडवर गुंडांचं वर्चस्व


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close