कोर्टाच्या निर्णयानंतर तृप्ती देसाईंची शिंगणापूरकडे कूच

April 2, 2016 1:59 PM0 commentsViews:

shani_mandir_bhumataअहमदनगर – 02 एप्रिल : शनी शिंगणापूर मंदिरात प्रवेशाबाबत हायकोर्टाने दिलेल्या निर्णय हा नारी शक्तीचा विजय आहे अशी उत्स्फुर्त प्रतिक्रिया देत रणरागिणी भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाईंनी आज (शनिवारी) शनी शिंगणापूरकडे पुन्हा कूच केलीये. तृप्ती देसाई आणि त्यांच्या सहकार्‍यांचा ताफा अहमदनगरच्या पुढे आलाय.

शनी शिंगणापूर मंदिराच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश देण्यासंदर्भात हायकोर्टाने शुक्रवारी महत्त्वपूर्ण निर्णय दिला. सर्वांना मंदिरात प्रवेशाचा अधिकार आहे आणि याची अंमलबजावणी राज्य सरकारने करावी असे निर्देश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले. कोर्टाच्या या निर्णयाचं भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी स्वागत केलं. आणि आज शनिवारीच शनी चौथर्‍यावर जाऊन शांततेत दर्शन घेणार अशी गर्जना केली. त्यानुसार, तृप्ती देसाई आज सकाळीच पुण्याहून शिंगणापूरला निघाल्या आहेत. सध्या त्यांचा ताफा अहमदनगरच्या पुढे आहे. आज काही केलं तरी चौथर्‍यावर जाऊन दर्शन घेणारच असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतलाय. पण, प्रशासन आज खरंच त्यांना
शिंगणापुरापर्यंत पोहोचू देणार का हाच खरा प्रश्न आहे. कारण, तृप्ती देसाई शिंगणापुरात पोचल्या तर तिथं त्यांना स्थानिक महिलांकडून मोठा विरोध होऊ शकतो. त्यामुळे कोर्टाच्या आदेशानंतर तृप्ती देसाई शनी मंदिराच्या चौथर्‍यावर पोहोचतात का हे पाहण्याचं ठरेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close