बर्थ डे बाॅय ‘सिंघम’च्या आयुष्याबद्दल…

April 2, 2016 5:06 PM0 commentsViews:

 बॉलिवूड अभिनेता अजय देवगनचा आज 47 वा जन्मदिवस आहे. त्याने आपल्या फिल्मी कारकिर्दीत अनेक दर्जेदार चित्रपटात काम केले आहे. चला तर मग आपण ही त्याच्या व्यावसायिक तसंच वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेऊया…

अजयने 1991 मध्ये ‘फुल और कांटे’ या चित्रपटापासून आपल्या करिअरची सुरुवात केली. अजयच्या दमदार अभिनय आणि ऍक्शनमुळे चित्रपट सुपरहिट झाला. त्यानंतर अजयने कधीही मागे वळून पाहिले नाही. त्याने एका मागोमाग एक सुपरहिट चित्रपट दिले. त्यामुळे अजयची ओळख ऍक्शन हिरो म्हणून झाली. अजयने आपल्या करिअरमध्ये विविध प्रकारच्या चित्रपटात काम केले. ऍक्शन, रोमान्स, कॉमेडी, थ्रीलर या सर्व प्रकारच्या चित्रपटात अजयने आपली छाप सोडली. अजयच्या अशाच वैविध्यपूर्ण अभिनयासाठी अजयला 1998 मधील ‘जख्म’ आणि 2002 मधील ‘दि लेजेण्ड ऑफ भगत सिंग’ या चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. अजयने गोलमाल, सिंघम, दृश्यम, हम दिल दे चुके सनम, इश्क, प्यार तो होना ही था अशा गाजलेल्या चित्रपटात काम केले आहे.

अजयच्या करिअर प्रमाणेच त्याची लव लाईफ ही चांगलीच चर्चेत राहिली. सुरुवातीच्या काळात त्याचे नाव करिश्मा कपूरसोबत जोडले गेले होते. परंतु, ह्या बाबत कमी लोकांनाच माहित आहे. 90 च्या दशकात ह्या जोडीला हॉट फेव्हरेट मानलं जायचं. दोघांनी एकत्र 5 चित्रपटात एकत्र काम केलं. परंतु, ही जोडी जास्त काळ टिकू शकली नाही आणि दोघे वेगळे झाले. त्यानंतर अजयचे नाव रवीना टंडन सोबत चर्चेत राहिलं. दोघांनी 1994 मध्ये दिलवाले सारख्या सुपरहिट चित्रपटात एकत्र काम केले. परंतु, ही जोडी सुद्धा फार काळ टिकू शकली नाही आणि दोघांचं ब्रेकअप झालं. त्यामुळे रवीना इतकी दुखावली गेली की, तिने एका मॅगझिनला दिलेल्या एका मुलाखतीत अजयवर
निशाणा देखील साधला होता. 1995 मध्ये हलचल चित्रपटाच्या शुटिंगच्या दरम्यान अजयची भेट काजोलशी झाली. त्यानंतर दोघांचे सूत जुळले आणि दोघे 1999 मध्ये विवाहबंधनात अडकले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close