डोनेशन घेणार्‍यांना बसणार लगाम

March 19, 2010 2:59 PM0 commentsViews: 2

19 मार्चभरमसाठ डोनेशन घेणार्‍या आणि माहितीपत्रकात खोटी आश्वासने देणार्‍या शिक्षणसंस्थांना आता चाप बसणार आहे.याबाबतच्या विधेयकाला मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. अशा प्रकरणांमध्ये दोषी आढणार्‍यांना 3 वर्षाचा तुरूंगवास आणि 50 लाखांचा दंड अशी तरतूद करण्यात आली आहे. अनेक शैक्षणिक संस्था आपल्या माहितीपत्रकात खोटी माहिती देऊन विद्यार्थ्यांची दिशाभूल करतात. या विधेयकामुळे शिक्षणाचा दर्जा वाढण्यास मदत होईल, अशी आशा सरकारला वाटत आहे.

close