पंकजा मुंडेंनी घेतलं शनैश्वराचं दर्शन

April 2, 2016 5:48 PM0 commentsViews:

pankaja_munde_shani02 एप्रिल : एकीकडे शनी शिंगाणपूरमध्ये शनी चौथर्‍यावर जाण्यापासून महिलांना रोखलं जात आहे तर दुसरीकडे राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी शनैश्वराचं दर्शन घेतल्याचं विरोधाभास चित्र पाहण्यास मिळत आहे. पंकजा मुंडे यांनी आष्टी तालुक्यातील धामणगाव कडे जाताना पाथर्डी येथील शनेश्वराचे दर्शन घेतले.

महिलांनी मंदिरात जावं पण हक्काने जाऊ नये. मंदिरात दर्शन घेणे हा श्रद्धेचा भाग आहे. मंदिरात हट्टाने प्रवेश मिळवण्यासाठी महिलांना सामाजिक शांतता भंग करू नये असं परखड मत व्यक्त करणार्‍या पंकजा मुंडे यांनी शनैश्वरांचं दर्शन घेतलं. पंकजा मुंडेंनी शनैश्वरावर तेल चढवून दर्शन घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर होत आहे. यावर पंकजा मुंडेंनी खुलासा केलाय.

आष्टीच्या दौर्‍यावर असताना रस्त्याच्या बाजूला एक उघडं मंदिर होतं. तेथील पुजारने आपल्याला दर्शन घेण्याची विनंती केली म्हणून मी दर्शन घेतलं. तिथे शनी दर्शनासाठी महिलांना कोणतीही बंद नव्हती. मी, काही जाणूनबुजून तिथे गेले नाही असा खुलासा पंकजा मुंडे यांनी आयबीएन लोकमतकडे केला. तसंच मी याधीही महिलांनी परंपरा जपली पाहिजे या माझ्याविधान ठाम असून महिलांच्या विकासाबद्दल आणखी काही गोष्टी आहे त्यावर आपण बोललं पाहिजे असंही पंकजा मुंडे यांनी सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close