दुष्काळाच्या भयंकर परिस्थितीकडे राज्यकर्त्यांचं दुर्लक्ष – शरद पवार

April 2, 2016 8:50 PM0 commentsViews:

सांगली – 02 एप्रिल : सध्या राज्यात दुष्काळाची भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, राज्यकर्त्यांचं दुर्लक्ष आहे आणि पशुधन वाचवण्याची इच्छा सरकारची दिसत नाही. चारा छावण्याबाबत ही हात राखून निर्णय घेतले जात आहेत असा आरोप राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केला. तसंच आमचं सरकार असतांना दुष्काळी भागात शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत नव्हत्या, उलट शेतकरी आत्मविश्वासाने दुष्काळावर मात करत होते असंही शरद पवार म्हणाले. ते सांगलीत बोलत होते.pawar on amir3

सांगली जिल्ह्यातील कवठेमहंकाळ येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते लोकनेते स्व. नानासाहेब सगरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं. यावेळी बोलतांना शेतकर्‍यांच्या आत्महत्या हा देशासमोरचा आताचा मोठा प्रश्न बनला असून आमचं सरकार असताना दुष्काळी भागात शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत नव्हत्या, उलट शेतकरी हे आत्मविश्वासाने दुष्काळावर मात करत होते असा सल्ला शरद पवारांनी राज्य सरकारला दिलाय. राज्यात दुष्काळाची भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळी परिस्थितीकडे, राज्यकर्त्यांचं दुर्लक्ष आहे आणि पशुधन वाचवण्याची आताच्या सरकारची इच्छा नाही. त्याचबरोबर पाण्याचे टँकर मर्यादित आहेत. चारा छावण्याबाबत ही हात राखून निर्णय घेतले जात आहेत असा आरोप शरद पवार यांनी केलाय.

दुष्काळाकडे दुर्लक्ष करणार्‍या, सरकार विरोधात जनतेने संघर्ष करण्याची तयारी ठेवावी आणि दुष्काळ प्रश्नी लोकशाही मार्गाने आंदोलने करावीच, मात्र वेळ प्रसंगी संघर्षाची पण तयारी ठेवावी असंही शरद पवार म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close