घराघरात पोहचलेल्या प्रत्युषाची ‘छोटी दुनिया’

April 2, 2016 9:04 PM0 commentsViews:

‘बालिका वधू’ फेम 24 वर्षीय अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीने तिच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. यामुळे मनोरंजन जगतात एकच शोककळा पसरलीये. बालिका वधु सारख्या लोकप्रिय मालिकेत तिने मोठ्या आनंदीची भूमिका साकारली. शिवाय ‘बिग बॉस-7’सारख्या मोठ्या रिऍलिटी शो मध्ये ती झळकली होती. त्यानंतर ‘सावधान इंडिया’, ‘झलक दिखला जा-5′, ‘किचन चॅम्पियन’, ‘पॉवर कपल्स’, कॉमेडी क्लासेस सारख्या शोज् मधून भरभरुन पसंती मिळवली. ‘पॉवर कपल्स’मध्ये ती आपल्या प्रियकर राहुल राज सिंगसोबत सहभागी झाली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close