अण्णा घेणार उपोषण मागे

March 19, 2010 4:38 PM0 commentsViews:

19 मार्चज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे गेले चार दिवसांपासून सुरू असलेले आपले उपोषण उद्या मागे घेणार आहेत. मागण्या पूर्ण करण्याचे सरकारने आश्वासन दिल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. पतसंस्थांच्या ठेवीदारांचे पैसे परत मिळवून द्यावेत, ही अण्णांची प्रमुख मागणी आहे. सहकारी पतसंस्था आणि बँकांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी नवीन कायदा करण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे.हा कायदा करण्यासाठी विद्या सहकारी बँकेचे चेअरमन विद्याधर अनास्कर यांच्या अध्यक्षतेखाली सरकार समिती स्थापन करणार आहे. अण्णांनी उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती करण्यासाठी जलसंपदामंत्री रामराजे नाईक-निंबाळकर, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आणि आदिवासी विकास मंत्री बबनराव पाचपुते हे उद्या राळेगणसिद्धी इथे जाणार आहेत.

close