बिजनौरमध्ये एनआयएच्या अधिकार्‍याची गोळ्या झाडून हत्या

April 3, 2016 11:56 AM0 commentsViews:

Mohammad Tanzil

उत्तर प्रदेश  – 03 एप्रिल :  पठाणकोट हल्ल्याच्या तपास करणार्‍या एनआयएच्या अधिकार्‍याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातल्या बिजनौरमध्ये हा प्रकार घडला असून मोहम्मद तांझील असं या अधिकार्‍याचं नाव आहे. या हल्ल्यात  मोहम्मद यांची पत्नी गंभीर जखमी झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मोहम्मद तांझील हे आपल्या कुटुंबासोबत एका लग्न संमारंभासाठी गेले होते. ते दिल्लीला परतत असताना त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. त्यांना तब्बल 21 गोळ्या लागल्या तर त्यांच्या पत्नीला चार गोळ्या लागल्या असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर नॉयडातल्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहेत. एनआयएचे पथक मोरादाबाद इथे पोहचले आहे. हल्लेखोरांचा कसून तपास सुरू करण्यात आला असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

गेल्या पाच वर्षांपासून एनआयएसाठी काम करणारे  मोहम्मद हे पोलीस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी होते. ते हवाई दलाच्या पठाणकोट तळावरील दहशतवादी हल्ल्याचा तपास करणार्‍या एनआयएच्या पथकाचा भाग होते. त्यामुळं त्यांच्या हत्येमागे दहशतवादी कनेक्शन असण्याचा संशय व्यक्त होत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close