प्रत्युषाच्या बॉयफ्रेंडची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल

April 3, 2016 3:15 PM0 commentsViews:

pratyusha banejee

मुंबई – 02 एप्रिल : अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्या प्रकरणात सतत वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. तिच्या मृत्यूनंतर लगेचच तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंगला पोलिसांनी ताब्यात घेतलं खरं पण त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती त्याच्या वकिलांनी दिली आहे.

राहुल राज सिंगने प्रेमात धोका दिल्याने प्रत्युषाने आत्महत्येचा निर्णय घेतल्याचं सर्वांचेच म्हणणं आहे. प्रत्युषाच्या आत्महत्येनंतर काल (शनिवारी) रात्री उशिरापर्यंत राहुलची चौकशी सुरू होती. आज पण त्याला पोलीस स्टेशनमध्ये चौकशी साठी बोलावण्यात आलं होतं. त्याच्या छातीत अचानक दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, आतापर्यंत पोलिसांनी 7 लोकांचा जबाब नोंदवला आहे. यात राहुलसह प्रत्युषाचे वडील आणि जवळच्या मित्रांचा समावेश आहे. प्रत्युषाच्या आत्महत्या मागे प्रॉपर्टीचा वाद होता का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तसंच,प्रत्युषाने आत्महत्या केल्यानंतर राहुल तेथून प्रत्युषाचा फोन घेऊन पळून गेला होता. आत्महत्येअगोदर राहुलशी झालेल्या वादामुळे तो शंकेच्या घेर्‍यात आला आहे. मात्र, राहुलने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close