शेतकरी कर्जबाजारी होऊ नये म्हणून प्रयत्न- मुख्यमंत्री

April 3, 2016 4:37 PM0 commentsViews:

sdasdasday

नाशिक – 03 एप्रिल :   शेतकर्‍यांच्या कर्जमाफीला आमचा विरोध नाही. पण शेतकरी कर्जबाजारी होऊ नयेत म्हणून प्रयत्न करण्याचं सरकारने ठरवलं आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (रविवारी) पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. भाजपच्या प्रदेश कार्यकारणीची दोन दिवसीय बैठकीला नाशिक सुरु आहे. त्यामध्ये बोलताना मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आणि दुष्काळ या मुद्द्यांवरून विरोधकांवर जोरदार टीका केली.

यापूर्वीच्या सरकारने कर्जमाफी केल्यावर शेतकरी कर्जबाजारी झाल्याचे चित्र पाहायला मिळत असल्याचंही त्यांनी सांगितलं. एका वर्षात आम्ही शेतकर्‍याला वेगवेगळ्या माध्यमातून आठ हजार कोटी रुपये दिले असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 6 हजार कोटीचं कर्जमाफी देऊन विरोधक खूप काही केल्याचं सांगतात पण आम्ही जवळपास 18 हजार कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात टाकूनही, आम्ही खूप काही केलंय, असं म्हणत नाही अशी टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, ‘वंदेमारतम’ हेच राष्ट्रगीत आणि ‘भारत माता की जय’जे कोणी म्हणार नाही, त्याना देशात राहण्याचा अधिकार नाही ही भाजपची स्पष्ट भूमिका आहे, असं प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close