अण्णांचे उपोषण मागे

March 20, 2010 8:57 AM0 commentsViews: 2

20 मार्चज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अखेर आज उपोषण सोडले आहे. जलसंपदा राज्यमंत्री रामराजे निंबाळकर, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, वनमंत्री बबनराव पाचपुते यांच्याशी चर्चा करून अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेतले. अण्णांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन सरकारने कालच दिले होते. पतसंस्थांमधील भ्रष्टाचार रोखण्याकरिता महत्त्वाच्या कायद्याचे विधेयक आगामी पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येईल, असे आश्वासन सरकराने दिले आहे. यामुळे ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळण्यास मदत होणार आहे. तसेच या कायद्यामुळे कर्जबुडव्या संचालकांना कठोर शासनही होऊ शकते. यासंबंधीचा जीआर सरकार लवकरच काढणार असल्याचेही आश्वासन दिले गेले आहे. पण धान्यापासून मद्यनिर्मितीच्या धोरणाबाबत मात्र यावेळीही अण्णांची बोळवण करण्यात आली आहे.

close