माजी खासदार अंकुशराव टोपे यांचं निधन

April 3, 2016 11:16 AM0 commentsViews:

sdsaday
03  एप्रिल :  जालना इथले माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंकुशराव टोपे (वय 74) यांचं आज पहाटे चेन्नईतील रुग्णालयात निधन झालं. माजी मंत्री राजेश टोपे यांचे ते वडिल होत. कारखान्याच्या परिसरात उद्या (सोमवारी) सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

शेती, सहकार आणि शिक्षण क्षेत्रात अंकुशराव टोपे यांनी मोठं कार्य केलं होतं. त्यांच्या जाण्यानं सामाजिक-राजकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close