महिला टी-20 वर्ल्ड कप वेस्ट इंडिजने जिंकला

April 3, 2016 4:40 PM0 commentsViews:

PRABHU EXPRESS

03 एप्रिल : इडन गार्डनवर रंगलेल्या महिला टी-20 वर्ल्ड कपच्या फायनल मॅच वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाचा 8 गडी राखून धुव्वा उडवला. विंडीजच्या महिलांनी पहिल्यांदाच टी-20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं आहे. विंडीजच्या हेली मॅथ्यूज आणि कॅप्टन स्टेफनी टेलर यांनी शतकी भागिदारी करत टी-20 वर्ल्ड कपचा खिताब पटकावला.

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी वेस्ट इंडिजला 149 धावांचे लक्ष्य दिलं होतं. विंडीजकडून मॅथ्यूजने 45 चेंडूत 6 चौकार आणि तीन षटकार लावत 66 धावांची खेळी केली. तर कर्णधार टेलरने 57 चेंडूत दमदार 59 धावा केल्या. या दोघांच्या भागिदारीमुळे विंडीजला विजयाचं लक्ष्य गाठता आलं.

टी- 20 महिला वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया टीमने सलग चौथ्यांदा फायनल गाठली होती. विशेष म्हणजे यापूर्वीच्या तीनही स्पर्धेत ऑस्ट्रेलिया महिला टीमच जिंकला होती परंतु, वेस्ट इंडिज संघाने ऑस्ट्रेलियाचा विजय रथ रोकण्यास यश मिळवलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close