केंद्र सरकारच्या कार्यालयांत मराठीचा वापर करा

March 20, 2010 9:04 AM0 commentsViews: 3

20 मार्चमहाराष्ट्रातील केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये मराठीचा वापर करण्यासाठी केंद्राकडे आग्रही भूमिका घेण्याचा ठराव विधान परिषदेत एकमताने पारित झाला. राज्यभरात मराठी पाट्या सक्तीच्या कराव्या आणि सगळा पत्रव्यवहार मराठीतूनच करावा, असा ठराव शिवसेनेने मांडला होता. तो ठराव आज विधानपरिषदेत पारित करण्यात आला. केंद्राच्या त्रिभाषा सूत्रानुसारच हा मराठी भाषेचा आग्रह धरण्यात आला आहे.शिवसेनेचे दिवाकर रावते यांनी याबाबतचा मुद्दा काल विधान परिषदेत मांडला होता.

close