चवदार तळ्याकडे दुर्लक्ष

March 20, 2010 9:16 AM0 commentsViews: 77

श्वेता पवार, महाड 20 मार्चदलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 ला महाडाच्या चवदार तळ्याला सत्याग्रह केला. त्याला आज 83 वर्ष पूर्ण होत आहेत. पण या ऐतिहासिक तळ्याकडे खुद्द महाड नगरपालिकेनेच दुर्लक्ष केले आहे.किल्ले रायगडच्या पायथ्याशी हे ऐतिहासिक तळे आहे. चौदा विहिरीचे विशिष्ट पाणी, अशी ओळख असलेले हे चवदार तळे कोरडे पडले आहे. तळ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी बांधलेले कारंजे बंद पडले आहे. तळ्यात सर्रास ड्रेनेज लाईन सोडण्यात आल्या आहेत. आणि रोझ गार्डनमध्ये गुरे चरत आहेत.2005 मध्ये आलेल्या पुरात तळ्यात पूर्णपणे गाळ साचला. पण हा गाळ उपसण्यासाठीचा निधी इतरत्र वापरला जात आहे.

close