मुंबई इंडियन्सचा मुकाबला बंगलोर रॉयलशी

March 20, 2010 9:20 AM0 commentsViews: 5

20 मार्चआयपीएलमध्ये आज पुन्हा एकदा मुंबईकरांना क्रिकेटची मेजवानी मिळणार आहे. सचिन तेंडुलकरच्या मुंबई इंडियन्सची मॅच बंगलोर रॉयल चॅलेंजर्सशी रंगणार आहे. दोन्ही टीम जबरदस्त फॉर्मात आहेत. मुंबईने राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली डेअर डेव्हिल्सविरुध्द विजय मिळवलेत. आणि आता ते सज्ज झालेत बंगलोर रॉयलचा पराभव करत विजयाची हॅट्‌ट्रीक करण्यासाठी. मुंबई इंडियन्सची टीम तुफान फॉर्मात आहे. सचिन तेंडुलकर, सनथ जयसूर्या, कायरन पोलार्ड, ड्वेन ब्राव्हो असे भक्कम बॅट्समन मुंबईच्या टीममध्ये आहेत. तर बंगलोरच्या खात्यातही दोन विजयाची नोंद आहे. बंगलोरने तीन मॅचपैकी दोन मॅचमध्ये विजय मिळवला आहे.

close