पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात

April 4, 2016 8:34 AM0 commentsViews:

ASSAM POLL

04 एप्रिल :  पश्चिम बंगाल आणि आसाममधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. चोख पोलीस बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पार पडत आहे.

जवळपास दीड महिना चालणार्‍या या निवडणुकीचा पहिला टप्पा सोमवारपासून सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालमधील 18, तर आसाममधील 65 मतदारसंघांमध्ये निवडणूक होत आहे. पश्चिम बंगालमध्ये 6 टप्प्यांत मतदान होत तर आसाममध्ये मतदान दोन टप्प्यांत होत आहे.

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्यासमोर डावे पक्ष – काँग्रेस आघाडीच्या तगड्या आव्हानांचा मुकाबला करावा लागणार आहे. दुसरीकडे, आसाममध्ये सलग चौथ्या वेळा निवडणूक जिंकण्याचे आव्हान मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्यासमोर आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close