आयफा ऍवॉर्डसाठी अमिताभचे पहिले मत

March 20, 2010 9:26 AM0 commentsViews: 4

20 मार्चमुंबईत जे डब्ल्यू मॅरियटमध्ये अमिताभ बच्चनने 11 व्या आयफा ऍवॉर्डसाठी पहिले मत दिले. हे मत देऊन बिग बीने आपल्या पहिल्या आवडत्या कलाकाराला निवडण्याची सुरूवात केली. यंदा आयफा सोहळा नव्या रूपात पाहायला मिळेल असेही त्यांनी सांगितले. मागच्या वर्षी एकही खान आयफासाठी उपस्थित नव्हता.पण यावेळी खूप नॉमिनेशन्स असल्यामुळे खान्सची उपस्थिती आयफाला लाभू शकते. यावर्षी अमिताभ बच्चन यांनी खूप सिनेमे केले आहेत. पण तरीही थ्री इडियट्स हा सिनेमा अमिताभचाही आवडता सिनेमा ठरला आहे.

close