त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभार्‍यात महिलांसह आता पुरूषांनाही बंदी

April 4, 2016 9:53 AM0 commentsViews:

Trimbakeshwar

04 एप्रिल :  त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या रविवारी झालेल्या बैठकीत मंदिराच्या गर्भगृहात सर्वांचाच प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षितता आणि मंदिरातील गर्भगृहातील पिंडीची होणारी झिज या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाल्याचे देवस्थान ट्रस्टच्या सूत्रांनी सांगितले.

सुप्रीम कोर्टाने देवस्थानच्या घटनेनुसार शासकीय पुजेशी संबंधित पुजक, तुंगार परिवार, सहायक, प्रदोष पुष्प पुजक यांनाच प्रवेश राहणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. हाय कोर्टाने महिलांना सर्व मंदिरात प्रवेश देण्याच्या निर्णयाचे त्र्यंबक देवस्थानकडून स्वागत करण्यात आलं आहे. बैठकीला देवस्थानच्या अध्यक्ष न्या. उर्मिला जोशी-फलके, एन. एम. नागरे, ऍड. श्रीकांत गायधनी आदी उपस्थित होते.

रविवारी झालेल्या सभेत देवस्थानतर्फे हा आदेश जारी करण्यात आला. सुटीच्या पार्श्वभूमीवर गदच् होण्याची शक्यता आहे. शिवाय गर्भगृहातील भौगोलिक परिस्थिती आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण कार्यालयाकडून प्राप्त सूचनेनुसार अभिषेक आणि पूजा साहित्यामुळे प्राचीन पिंडीची झिज होऊ नये याबद्दल काळजी घेण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याचं विश्वस्त कमिटीचं म्हणणं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close