टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर वेस्ट इंडिजचा कॅप्टन डॅरेन सॅमी झाला भावूक

April 4, 2016 12:03 PM0 commentsViews:

 

04 एप्रिल :   इंग्लंडविरुद्धच्या फायनल मॅचमध्ये विजय मिळवून टी 20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर वेस्ट इंडिजचा कॅप्टन डॅरेन सॅमी आणि इतर क्रिकेटपटू भावुक झालेले दिसले. विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सॅमी आणि ड्वायेन ब्राव्होने वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डावर जोरदार टीका केली.

वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने कोणत्याही क्रिकेटपटूला मदत केली नाही. टुर्नामेंटसाठी जेव्हा आम्ही भारतात आलो तेव्हा आमच्याकडे आमची जर्सीही नव्हती. कोलकात्यात आल्यानंतर आमच्यासाठी जर्सी प्रिंट करुन घेतली. तसंच वेस्ट इंडिजने केवळ क्रिकेटपटूंची एकजुटता आणि कोचिंग स्टाफच्या मदतीमुळे वर्ल्डकप जिंकल्याचं सॅमीने सांगितलं.

sammy-d-1459707241-800

हा विजय कॅरेबियनमधल्या फॅन्ससाठी असल्याचंही सॅमीने सांगितलं. सॅमीसोबत वेस्ट इंडिजचा अनुभवी क्रिकेटपटू ड्वायेन ब्राव्होनेही वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डावर ताशेरे ओढले. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाकडून खेळाडूंना जी मदत मिळायला हवी होती, ती मिळाली नाही. याउलट त्यांच्यापेक्षा अधिक मदत बीसीसीआयने वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूंना केल्याचे तो म्हणाला.

खुद्द सचिन तेंडुलकरनेही विडींज टीमला खरे चॅम्पियन म्हणताना वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाला टीमला सपोर्ट तसंच त्यांच्या समस्यांकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close