मेहबूबा मुफ्तींनी घेतली जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

April 4, 2016 1:44 PM0 commentsViews:

sadsadsady

04 एप्रिल :   पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती यांनी सोमवारी जम्मू-काश्मिरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जम्मू-काश्मीरचे राज्यपाल एन.एन. वोरा यांच्याकडून राजभवनात मुफ्ती यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. त्या जम्मू-काश्मीरच्या 13व्या मुख्यमंत्री आहेत. याशिवाय, त्यांना देशातील पहिल्या मुस्लीम महिला मुख्यमंत्रिपदाचा मान मिळाला आहे.

जानेवारी महिन्यात जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री आणि पीडीपी पक्षाचे प्रमुख मुफ्ती मोहम्मद सईद यांचे निधन झाल्यानंतर राज्याची धुरा सांभाळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. गेल्या दोन महिन्याहून अधिक काळ याप्रकरणी भाजपा-पीडीपीत चर्चा सुरू होती. अखेर मेहबूबा मुफ्ती मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील, असा निर्णय घेण्यात आला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close