सेना-भाजपमध्ये वाद विकोपाला, प्रभागसमित्यांचे भरले सेनेनं अर्ज

April 4, 2016 4:46 PM0 commentsViews:

sena_bjp3मुंबई – 04 एप्रिल : गेले काही दिवस सेना भाजपमध्ये सुरू असलेला तंटा आज विकोपाला गेलाय. सेनेनं युतीधर्म न पाळता पालिकेच्या आठ प्रभागसमित्यांचे भाजपला विश्वासात न घेताच अर्ज भरले आहेत.

भाजपं काही समित्यांसाठी आग्रही होती. त्या सेनेला द्यायच्या नव्हत्या. पण, त्यामुळे हातघाईला येत सेनेनं आताताईपणा दाखवला.
त्याचा परिणाम असा झाला की, झालेल्या प्रकाराची भाजपच्या पालिकेतल्या नेत्यांनी वरिष्ठांना तक्रार केली आहे. आणि इथून पुढे युतीधर्म भाजपंने पण पाळायचा का असा विचार केला जातोय. आर नॉर्थ आणि आर सेंट्रल या प्रवाह समितीसाठी शितल म्हात्रे यांनी अर्ज केलाय. उद्या स्थायी समिती आणि शिक्षण समिती अध्यक्षांची निवडणूक आहे त्यावर पण या सर्वाचा परिणम होऊ शकतो.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close