देवीची पूजा चालते मग महिलांना प्रवेश का नको? -प्रतिभाताई पाटील

April 4, 2016 5:45 PM0 commentsViews:

मुंबई – 04 एप्रिल : ज्या देशात महिलांची पूजा केली जाते, त्या देशात त्यांना मंदिरात प्रवेश कसा नाकारला जाऊ शकतो. आता महिलांनी मग देवीच्या मंदिरात पुरुषांना प्रवेश नाकारायचा का ? असा सवाल भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी विचारलाय.

विदर्भ वैभव मंदीर न्यासच्या वतीनं वाय. बी. चव्हाण सेंटर इथं महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शणीशिंगणापूर या विषयावर त्या बोलल्या. विदर्भ वेगळा व्हावा की होऊ नये याबद्दल मी सांगू शकत नाही. पण, विदर्भाचा विकास झाला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलंय. अंबाबाईंची पूजा चालते, सरस्वतीची पूजा केली जाते मग महिलांना पुरुषांना मंदिरात प्रवेश नाकारायंच का असा सवाल प्रतिभाताईंनी उपस्थिती केला. याच कार्यक्रमात विदर्भातील इतिहास संशोधक पुरुषोत्तम नागपुरे यांचा जीवन गौरव पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close