तोगडिया पोलिसांच्या ताब्यात

March 20, 2010 10:09 AM0 commentsViews: 3

20 मार्चविश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांना काल रात्री उशिरा ओरिसात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कंधमाल येथील दंगलग्रस्त भागात जाण्याचा प्रयत्न तोगडिया करत असताना, पोलिसांनी त्यांना अडवले. मात्र तरीही तिथे जाण्याचा हट्ट तोगडियांनी कायम ठेवला. ओरिसा सरकारने कंधमालला जाण्यास तोगडियांना बंदी घातली होती. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी तिथेच धरणे आंदोलन केले. आज विहिपने कंधमालमध्ये बंद पुकारला आहे. त्याला भाजपनेही पाठिंबा दिला आहे.