बर्थ डे पार्टीवर तब्बल 100 कोटी खर्च !, पाहा मल्ल्यांची मायानगरी

April 4, 2016 9:53 PM0 commentsViews:

कर्जबुडवे उद्योजक विजय मल्ल्यांचं नाव आज देशाच्या सर्वात मोठा डिफॉल्टर म्हणून घोषित करण्यात आलं. एक काळ होता, जेव्हा मल्ल्या आपले जीवन ऐशोआरामात जगण्यासाठी प्रसिद्ध होते. पण आता ते खुद्द आकाशातून जमिनीवर आलेत.

2012 मध्ये ‘फोर्ब्स’ने विजय मल्ल्यांच्या संपत्तीची किंमत जवळपास 5000 कोटी इतकी सांगितली होती. विजय मल्ल्या युनायटेड ब्रुव्हरीजचे प्रमुख आहेत आणि ग्रुपमध्ये 25 टक्के वाटा आहे ज्याची किंमत जवळपास 5500 कोटी इतकी असून युनायटेड ब्रुव्हरीजमध्ये एकूण 11 कोटींचा त्यांचा वाटा आहे. त्यांच्याकडे 750 कोटींचा मोंटो कार्लोद्विप असून दक्षिण आफ्रिकामध्ये 12000 हेक्टरचा गेम लॉन्ज आहे. शिवाय त्यांच्याकडे हिमालयाजवळ 1000 टुरिझम साईट असून दिल्ली आणि मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये आलिशान घरे आहेत.

मल्ल्याचे स्कॉटलँड, लंडन आणि न्यूयॉर्क सारख्या शहरात घरे असून विदेशातल्या त्यांच्या संपत्तीची किंमत जवळपास 2000 कोटी आहे. विजय मल्ल्यांना समुद्र सफारी फार आवडत असल्यामुळे 2006 मध्ये त्यांनी कतारमधील एका राजपरिवाराकडून 756 कोटीमध्ये एक यॉट खरेदी केली. जी त्यावेळची भारतातली सर्वात महाग यॉट होती.

समुद्र सफारीसह मल्ल्यांना महागड्या गाड्यांची ही खूप आवड आहे. त्यांच्याकडे विंटेज गाड्यांचा खजिना असून त्यांच्याकडे एकूण 250 गाड्या आहेत. परंतु, कर्ज चुकवण्यासाठी त्यंाना आपल्या गाड्यांची विक्री देखील करावी लागली. मल्ल्याला घोडेसवारीची फार आवड आहे. बंगळुरुमध्ये त्यांचे 450 एकर तबेला आहे.

लंडनमध्ये झालेल्या लिलावात मल्ल्याने टिपू सुल्तानची तलवार 4 कोटीमध्ये विकत घेतली. एन्टिक वस्तुची आवड असणार्‍या मल्ल्याने 2009 मध्ये अमेरिकेत महात्मा गांधींच्या वस्तूंच्या लिलावात मल्ल्याने 9 कोटींमध्ये गांधीजींची एक चप्पल, एक घड्याळ आणि एक पितळाची थाळी खरेदी केली.

पार्टीचे शौकिन असणारे मल्ल्यांनी त्यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आपल्या बर्थडे पार्टीसाठी तब्बल 100 कोटी रुपये खर्च केले. सध्या मल्ल्या लंडनपासून काही किलोमीटर दूर असलेल्या आपल्या आलिशान घरात रहात आहेत, जे सध्या जगातल्या सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close