देखण्या ‘मारवाडी’ घोड्यांचं प्रदर्शन

April 4, 2016 10:23 PM0 commentsViews:

महाराणा प्रतापांचा चेतक असो किंवा शिवाजी महाराजांची घोडी राणी या दोन्ही घोड्यांची जात ही ‘मारवाडी’ घोड्याची. जातीवंत घोड्यांच्या प्रेमातून ‘मारवाडी इंडिजिनियर्स हॉर्स सोसायटी’ने महाराष्ट्रातलं या घोड्यांच पहिलं प्रदर्शन पुण्यात जापलूप इक्वॅस्टेरियनला
भरवलंय. यावेळी अनेक जातीवंत घोड्यांच्या मालकांना बक्षीसंही देण्यात आली. अत्यंत तल्लख चपळ,तजेलदार आणि सुंदर दिसणारी ही घोड्यांची ही जात ‘वॉर हॉर्स’ म्हणून ओळखली जाते. गुजरातपासून या घोड्यांच्या पैदासीला सुरूवात झाली त्यानंतर राजस्थानमध्ये मारवाड प्रांतात ही पैदास मोठ्या प्रमाणावर सुरूवात झाली म्हणूनच त्यांचं नाव मारवाडी असं ठेवण्यात आलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close