हेडलीच्या चौकशीची परवानगी मिळणार

March 20, 2010 10:56 AM0 commentsViews: 1

20 मार्च मुंबईवरील 26/11च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड डेव्हिड हेडली याच्या चौकशीची भारताला परवानगी मिळणार आहे. अमेरिका ही परवानगी देणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी दिली आहे. अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. अमेरिकन कोर्टात भारत, पाक, आणि डेन्मार्कमध्ये दहशतवादी हल्ले घडवून आणल्याचे हेडलीने मान्य केले आहे. हेडलीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्याच्या मुद्द्यावर चिदंबरम यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र राज्यमंत्र्यांशी चर्चा केली. तर हेडलीच्या चौकशीसाठी गृहमंत्री अमेरिकेच्या न्याय विभागाच्या प्रमुखांशी चर्चा करणार आहेत

close